ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नका : भाजपचे राज्यपालांना निवेदन

देवरी 15 – नुकतेच महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाशिवाय पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका घेण्याचे घोषित केले आहे. या विरोधात 15 सप्टेंबरला देवरी तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना देवरी तहसिलदार मार्फत निवेदन पाठवण्यात आले आहे.
महाराष्ट्रात ओबीसी समाजावर भविष्यात होणाऱ्या अन्यायाची दखल न घेता महाराष्ट्रातील महविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाशी विश्वासघात करून आरक्षण संपुष्टात आणला आहे.
येणाऱ्या काळात होणाऱ्या नगर पंचायत, नगर परिषद, नगर पालिका, महानगर पालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. परंतू , यासंबंधी ओबीसी समाजाच्या भविष्याचा कोणताही विचार न करता महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी समाजाच्या आरक्षणाची बाजू वकिलामार्फत चुकून सुद्धा प्रभावीपणे मांडली नाही. त्यामुळे ओबीसी समाजावर नको ते अन्याय झाले आहे. आणि म्हणून, ओबीसी समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी आज दि. १५ सप्टेंबरला देवरी तालुका भाजपच्या वतीने ओबीसी समाजाला आरक्षण दिल्याशिवाय महाराष्ट्रात कोणत्याही निवडणुका न घेण्यासाठी महामहीम राज्यपालांना स्थानिक तहसीलदार मार्फत निवेदन पाठविले आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद संगीडवार, सचिव यादवराव पंचमवार, ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष राजेश चांदेवार, ज्येष्ठ मार्गदर्शक लक्ष्मणराव नाईक, तालुकाध्यक्ष अनिलकुमार येरणे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष छोटू भाटिया, ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष डॉ. जितेंद्र रहांगडाले, तालुका महामंत्री योगेश ब्राह्मणकर, गजानन शिवणकर, प्रेमलाल मुंगणकर, महिला शहर अध्यक्षा माया निर्वाण, ओबीसी महिला आघाडी तालुकाध्यक्षा रचना उजवने, तनुजा भेलावे, विद्यार्थी मोर्चा तालुकाध्यक्ष दिशांत चन्ने, उपाध्यक्ष पियुष दखने महामंत्री देवेंद्र गायधने, हितेश हटवार, धिरज तिरपुडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Share