सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी देवरी च्या विद्यार्थ्यांचे सुयश
देवरी 02: महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षा 2021 च्या प्रथम द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षेत देवरी येथील सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी च्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा यशाची परंपरा कायम ठेवत अभियांत्रिकी पदविका परीक्षेत भरघोष यश संपादन केले.
महाविद्यालयातून तृतीय वर्षातील संगणक अभियांत्रिकी विभागातील मुकेश योगराज कारेमोरे याने 86% टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला आहे, अनुविद्युत अभियांत्रिकी मधील आकिब फारुक शेख याने 84% टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकाविला आहे, तसेच विशाल परमानंद नंदेश्वर याने 83.47% टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक, तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील ज्योती दुर्योधन राऊत 78.11% गुण घेऊन यश संपादन केले आहे. द्वितीय वर्षातील संगणक अभियांत्रिकी विभागातील अवनी संतोष ठोंबरे 83.33% टक्के, पूजा दिवाकर यावलकर 82.67% व पल्लवी टेकचंद देखने 82.53% टक्के गुण घेऊन द्वितीय वर्षात विद्यालयातून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला आहे, तसेच पायल पुरण पटले 79% गुण घेऊन यश संपादन केले आहे. तसेच प्रथम वर्षात अनुविद्युत अभियांत्रिकी मधील नितीन दिलीप पंचेश्वर याने 82.5% टक्के, फैजान अमीनखान खान याने 77.75% टक्के, तसेच संगणक विभागातील योगेश भीमराव धमगाये याने 76.25% टक्के गुण घेऊन अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला आहे, तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील व्यंकट वामन फुंडे याने 72.84% गुण घेऊन यश संपादन केले आहे.
महाविद्यालयातून यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्थेचे संस्थापक झामसिंगजी येरणे, सचिव अनिल येरणे, प्राचार्य आशिषसिंग खतवार व सर्व विभागातील विभागप्रमुख प्रीती नेताम, मुकेश तरोने, स्नेहल गणवीर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.