आता गोंदियामध्येच होणार प्लाझ्मा थेरपी

मेडिकल कॉलेजमध्ये प्लाझ्मा थेरपी सेंटर सुरु

डॉ सुजित टेटे
गोंदिया 21: गोंदिया मेडिकल कॉलेज मध्ये मुख्यमंत्री निधीतुन प्लाझ्मा थेरपी सुरू करण्यात आले होते परंतु अन्न व औषधी विभागाची परवानगी न मिळाल्यामुळे केंद्र सुरू झालेले नव्हते त्यामुळे प्लाझ्मा दान करणाऱ्यांना नागपूरला जाऊन प्लाझ्मा दान करावे लागत होते. या विषयाला वृत्तपत्रे आणि मीडिया ने प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष केंद्रित करून अन्न व औषधी विभागाशी संपर्क साधून परवाना मिळण्याचे प्रयत्न चालविले होते. यालाच यश मिळत मुंबई चे अन्न व औषधी विभागाने हे केंद्र सुरू करण्याची नुकतीच परवानगी दिली असून गोंदिया जिल्हात प्लाझ्मा थेरपी केंद्र सुरू झाल्याने समस्येचा समाधान झालेला आले.

प्लाझ्मा दान करण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले असून covid19 च्या रुग्णावर प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Share