आता देशभर वाहनांच्या क्रमांकात असणार ‘भारत सिरिज’; नबंर प्लेटवर ‘MH’ नाही तर, ‘BH’ असणार

नवी दिल्ली- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून वाहनांच्या क्रमांकात मोठा बदल केला आहे. यापुढे वाहनांच्या क्रमांकात भारत सिरिज (BH-series) असे लिहिलेले असणार आहे. त्यामुळे वाहनांच्या नबंर प्लेटवर आता राज्याचे चिन्ह काढून त्याठिकाणी BH हे चिन्ह दिसणार आहे. सर्व देशात आता एकच चिन्ह असणार आहे.

देशातील वाहनांसाठी आता नवीन नोंदणी चिन्ह जाहिर करण्यात आले आहे. राज्याच्या चिन्हा ऐवजी वाहनांना भारत सिरिज (BH-series) वाहनांच्या क्रमांकाआधी BH असे लिहिलेले असणार आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील वाहन असल्यास त्यावर MH असे लिहिलेले असायचे. त्याठिकाणी आता BH असे लिहिलेले असणार आहे.

वाहनांच्या सुरळीत वाहतुकीसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करताना कोणतीही अडचण येणार नाही.

Share