अनेक मुस्लिम महिलांचा शिवसेनेत प्रवेश

प्रहार टाईम्स
देवरी
: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना महिला आघाडीच्या देवरी तालुका उपसंघटक सलमा पठाण यांच्या पुढाकाराने देवरी येथील अनेक महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्या महिलांमध्ये बहुसंख्य मुस्लिम महिलांचा समावेश होता.

शिवसेना महिला आघाडी गोंदिया जिल्हा कार्यालय देवरी येथे शिवसेना तालुका प्रमुख सुनील मिश्रा यांचे अध्यक्षतेखाली मोहरम कार्यक्रमाचे आयोजन करुन शरबत वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सौ करुणा कुर्वे यांनी केले होते. या कार्यक्रमात अनेक महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना तालुका प्रमुख सुनील मिश्रा आणि देवरी विधानसभा संघटक राजीक खान यांनी मोहरमच्या शुभेच्छा देवून आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सौ.करुणा कुर्वे, शिवसेना तालुका प्रमुख सुनील मिश्रा, देवरी विधानसभा संघटक राजीक खान, शहर प्रमुख राजा भाटिया, तालुका उपप्रमुख दालचंद मडावी, ओबीसी तालुकाध्यक्ष दिनदयाल मेश्राम, तालुका संघटिका प्रिती उईके, तालुका उपसंघटिका सलमा पठाण, देवरी शहर उपसंघटिका सारिका आयतुलवार प्रामुख्याने उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share