धक्कादायक …! नागपुरात ब्लॅंकेटचा व्यवसाय करणाऱ्यासाठी आलेला अफगाणी नागरिक निघाला ‘तालिबानी’

काबुल : अफगानिस्तानावर तालिबानने पूर्णपणे ताबा मिळवला आहे. तालिबान राजवट परत येऊ लागल्याने अनेकांनी देश सोडण्यासाठी काबुल विमानतळावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे अफगानिस्तानमधील महिला, तरुणींसमोर दुसरेच मोठे संकट उभे राहिले आहे.

यातच तालिबान्यांविरोधात जगभरातून विरोध दर्शविण्यात येत आहे. अनेकांकडून अफगाणी लोकांप्रती चिंता व्यक्त केली जात आहे. जगाच्या इतिहासात अफगाणिस्तानचा उल्लेख “महाशक्‍तींचे/साम्राज्यांचे कब्रस्तान’ असा केला जातो.

यातच भारतातून धक्कादायक बातमी येत आहे. महाराष्ट्रातील नागपूर या उपराजधानीमध्ये अफगाणी नागरिक  नूर मोहम्मद ऊर्फ अब्दुल हक टुरिस्ट व्हिसावर आला होता.  हा अफगाणी नागरिकाचा  थेट संबंध  तालिबानी संघटनेशी निघाला आहे. तो या संघटनेचा सदस्य असल्याची माहिती समोर येत आहे.

नागपूरचा स्थानिक वृत्तानुसार, या अफगाणी नागरिकाला नागपूर पोलिसांनी धडक कारवाई करत १६ जूनला अटक केली आहे. तो भारतात १० वर्षापूर्वी आला असून नागपुरातील मार्केट परिसरात लपून राहत होता. तो नागपुरात चादर, ब्लॅंकेट चा व्यवसाय करण्यासाठी आला होता. मात्र याच दरम्यान त्यांनी तालिबानी संघटनांचे फेसबुक पेजवर लाईक आणि कमेंट करीत होता. मात्र सोशलवरील या कार्यामुळे तो नागपूर पोलिसांच्या रडारवर आला. त्यानंतर त्याला १६ जूनला पोलिसांनी अटक केली. यावेळी त्याचा तपास करण्यात आला त्याच्या शरीरावर गोळी लागल्याचे निशाण होते.

दरम्यान, स्थानिक  पोलिसांच्या अटकेनंतर  ॲंटी टेरिरिस्ट स्कॉड (एटीएस) आणि इंटेलिजन्स ब्यूरो (आयबी) यांनी नूर मोहम्मदची चौकशी केली. त्याने ब्लॅंकेट व चादर  विकण्यासाठी भारतात आल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यामुळे सुरक्षा एजन्सीने त्याला क्लीन चीट देत २३ जूनला रवानगी अफगाणिस्तानात केली.

मात्र आठवडाभरात नूर मोहम्मद हा तालिबानी संघटनेशी जुळला आणि अफगाण सेनेच्या विरोधात शस्त्र घेऊन तयार झाला. त्याचा आता मुजाहिदांच्या समर्थनार्थ त्याचा व्हिडिओ आणि एलएमजी गनसोबत त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे नागपुरात आलेला हा अफगाणी नागरिकाचा नूर मोहम्मद ऊर्फ अब्दुल हक थेट संबंध तालिबानी संघटनेशी निघाला आहे. तो या संघटनेचा सदस्य असल्याचे स्पष्ट झाले आहे . हा नागपूर पोलिसांच्‍याही हाती लागला आहे.

यातच, नागपूर शहरात सध्या ९५ अफगाणी नागरिक शरणार्थी म्हणून वास्तव्यास आहेत. त्यापैकी सर्वाधिक अफगाणी हे गिट्टीखदान पोलिस स्टेशनच्या हद्दीत वास्तव्यास आहेत. सर्वाधिक अफगाणी ब्लँकेट व सुका मेवा विकण्याचा व्यवसाय करून नागपुरात उदरनिर्वाह करीत आहेत. अफगाणिस्तानमधील घडामोडीनंतर नागपूर पोलिस सतर्क झाले आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share