शिवसेना महिला आघाडी जिल्हा कार्यालयात आदिवासी दिन व क्रांती दिन साजरा

देवरी 09:– आज शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जिल्हा कार्यालय येथे जागतिक आदिवासी आणि क्रांती दिन साजरा करण्यात आला. आदिवासी दिनाचे व क्रांती दिनाचे औचित्य साधून आदिवासी क्रांतीदूत बिरसा मुंडा यांचे पूजन करून सर्व क्रांतीवीरांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सौ.करुणा कुर्वे, तालुका संघटिका सौ. प्रिती उईके, शहर संघटिका सौ. निलेशा रामटेके, दिपा चंदेल, सारिका आयतुलवार प्रामुख्याने उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share