मुख्यमंत्र्यांसोबत कोविड टास्क फोर्सची बैठक : नव्या निर्णयाची शक्यता

वृत्तसंस्था / मुंबई : काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधून सर्वसामान्यांना लोकल सुरु करण्यासह अनेक महत्वाच्या मुद्यांवर भाष्य केले . मात्र प्रार्थनास्थले, रेस्टॉरंट, मॉल्स उघडण्याबाबत अद्याप काही निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. आज यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे रात्री ८.३० वाजता कोविड टास्क फोर्ससोबत बैठक करणार आहेत. या बैठकीनंतर यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. हॉटेल्सला देखील रात्री १० वाजेपर्यंत परवानगी मिळावी यासंदर्भात आजच्या टास्क फोर्सच्या बैठकीत भूमिका मांडणार असल्याचे मंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल म्हणाले होते की, रेस्टॉरंट, मॉल, प्रार्थनास्थळे याबाबत टास्कफोर्सशी चर्चा करून निर्णय घेऊ. महाराष्ट्रातील जनतेने राज्य शासनाला आतापर्यंत सहकार्य केले म्हणूनच मुंबई मॉडेलचे, महाराष्ट्राचे कौतूक जगभर झाले. याचे सर्व श्रेय माझे नसून राज्यातील जनतेचे असल्याचेही ते म्हणाले होते.

Print Friendly, PDF & Email
Share