माध्यमिक शाळांत परीक्षेत श्रीमती के एस जैन कनिष्ठ महाविद्यालयाचे सुयश

देवरी 5: नुकताच इयत्ता 12 वी चा निकाल जाहीर झाला असून देवरी तालुक्यातील श्रीमती के एस जैन कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलेला आहे.

विज्ञान शाखेतून प्रतिमा बहेकार हिने 81.66% मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला तसेच सुरेखा अडडुल्ला हिने 80.50% द्वितीय तेजस्विनी गणवीर 79.66% तृतीय, त्रिवेणी कटरे 79.33% , तृप्ती बागडे 76.83% यांनी प्राप्त केले.याच प्रमाणे कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी आपली चुणूक दाखवीत भाग्यश्री बागडे 78.17% प्रथम , प्रिया कावळकर 77.33%, पूजा बागडे 69.17% मिळवून यश संपादन केले .

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळा समितीचे अध्यक्ष महेशकुमार जैन यांनी अभिनंदन केले त्याच बरोबर शाळेचे प्राचार्या रजिया बैग आणि शिक्षकरुंद यांनी अभिनंदन केले.

Print Friendly, PDF & Email
Share