IED Blast | छत्तीसगडमधील दंतेवाड्यात नक्षलवाद्यांचा सुरुंग स्फोटात १२ ग्रामस्थ

दंतेवाडा : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भुसुरुंगाचा स्फोट (IED Blast) होऊन त्यात बोलेरो वाहनामधील १२ जण जखमी झाले आहेत. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे.

गेल्या तीन वर्षात छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत २०४ लोकांचा मृत्यु झाला आहे. दंतेवाडा जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी सांगितले की, जिल्ह्यातील मालेवाही पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घोटिया गावाजवळ नक्षलवाद्यांनी भुसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. त्यात बोलेरो वाहनाचे नुकसान झाले आहे. या घटनेत १२ ग्रामस्थ जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना आज सकाळी साडे सात वाजण्याच्या दरम्यान घडली. नागरिक एका बोलेरो वाहनात बसून नारायणपूरहून दंतेवाडाकडे जात होते. घोटिया गावाजवळ बोलेरो पोहचल्यावर नक्षलवाद्यांनी भुसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. त्यात वाहनाचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचून त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

Share