रिमझिम पावसाने तालुक्यातील शेतकरी आनंदी..!

प्रा. डॉ. सुजित टेटे देवरी 28: तालुक्यात पावसाने दांडी मारल्यापासून येथील शेतकरी चिंतेत होता. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय उपलब्ध आहे त्यांच्या शेतीविषयक कामांकडे बघून नैसर्गिक पावसावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी चिंता वाढलेली होती परंतु मागील 2 दिवसापासून तालुक्यात समाधानकारक पावसाची हजेरी लावली असून बळीराजा खुश झाला आहे.

देवरी तालुका मागासलेला तालुकाअसून येथील बहुतांश लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाचे दांडी मारल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाल्यावर चित्र होते. कोरोनाने सर्वांचे रोजगार गेले. त्यामुळे बाहेर मजुरी करणारा वर्ग स्वगावी परतला असून शेतीला प्रथम प्राधान्य देतांना दिसत आहे . पावसाने लावलेल्या हजेरीमुले शेतकरी राजा ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्नक्कीच रोवणीचे काम उरकवून आनंदोत्सव साजरा करेल असे चित्र दिसत आहे.

कोरोना काळात निर्बंधामुळे चिंतातुर झालेला शेतकरी आपल्या शेतात मशागत करतांना अतिशय आनंदी दिसत असून वरूनराजा शेतकऱ्यावर नक्कीच मेहरबान राहणार आणि त्यांच्या संकटांना दूर करेल अशीच अपेक्षा आहे.

एकंदरीत पावसाने लावलेल्या हजेरीमुळे जलस्रोतात वाढ निश्चितच होणार आणि शेतकत्याला याचा देखील फायदा होणार. तालुक्यातील शेतकरी रिमझिम पावसाच्या सरींसोबत शेतात राबतांना आपल्या कुटुंबासोबत आनंदोत्सव साजरा करीत आहे .

Share