देवरी नगरपंचायत अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना त्वरित निधी उपलब्ध करुण द्या
आमदार कोरोटे यांची गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे मागणी.
देवरी, ता.२८: गोंदिया जिल्ह्यातील देवरी नगरपंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना म्हाडा प्राधिकरनातून बी.एल.सी. वितरनाबाबत सादर केलेल्या प्रस्तावांना मंजूरी देवुन घरकुल लाभार्थ्यांना त्वरित निधी उपलब्ध करुण द्यावे अशी मागणी आमगांव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना नुकतेच पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.
मंत्री जितेंद्र आव्हाड यांना पाठविलेल्या पत्रात आमदार सहषराम कोरोटे यांनी म्हटले आहे की, देवरी च्या नगरपंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतून के घरकुल लाभर्थ्यांची निवड करुण त्यांना घरकुल बाँधकामाची मंजूरी दिली. परंतु अनेक दिवासापसुन घरकुल बांधकाम निधी अभावी रेगांळलेले ह्या लाभर्थ्यासमोर घरकुल बांधन्यात अनेक अड़ीअड़चनिंना सामोर जावे लागत आहे.त्यामुळे येथील घरकुलाचे बांधकाम मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत.
अशा परिस्थितीत अनेक घरकुल लाभर्थ्यांना भर पावसाळ्यात उघड़यावर राहण्याची वेळ आली आहे. जर ह्या घरकुल लाभर्थ्यांना प्रलंबित निधि मिळाली तर त्यांना मदत होईल. तरी ह्या लाभर्थ्यांचे प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळालेली घरकुल बांधकामाचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत होईल.
देवरी नगरपंचायत अंतर्गत मंजूर प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभर्थ्यांना म्हाडा प्राधिकरनातून बी.एल.सी. बाबत सादर केलेल्या प्रस्तवांना मंजूरी देवुन घरकुल लाभर्थ्याचे निधी त्वरित हस्तांतरित करावे अशी मागणी आमदार सहषराम कोरोटे यांनी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना पाठविलेल्या पत्रातुन केली आहे.#