ठिकठिकाणी वृक्षारोपण करून शिक्षक सेनेने साजरा केला ‘प्रेरणा दिवस’

देवरी 28: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘प्रेरणा दिवस’ म्हणून राज्यात १० लाख रोपटे लावून वृक्षारोपण शिव पंधरवाडा साजरा करण्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांचे नेतृत्वाखाली, राज्य समन्वयक नितीन चौधरी आणि नागपूर विभागीय अध्यक्ष गंगाधर नाकाडे यांचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेकडून ध्येय निश्चित केले आहे. याच अनुषंगाने शिक्षक सेना जिल्हा गोंदियाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अनिल कुर्वे यांच्या पुढाकाराने आणि जिल्हा सरचिटणीस चेतककुमार झंजाळ व देवरी तालुका अध्यक्ष सुभाष दुबे यांच्या सहकार्याने उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गोंदिया जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये आणि अनेक ठिकाणी वृक्षारोपण करून ‘प्रेरणा दिवस’ साजरा करण्यात आला.

लोहारा येथील सुरतोली माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण प्रसंगी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल कुर्वे देवरी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष बी.टी. पवार, देवरी जिल्हा सरचिटणीस चेतककुमार झंजाळ, तालुका अध्यक्ष सुभाष दुबे, मुख्याध्यापक के.ए.पारधी, सहायक शिक्षक यु.बी.कोरे, एन.एच. नाईक, सौ.अल्का दुबे, सौ. शहनाज मिर्झा प्रामुख्याने उपस्थित होते. जि.प.पूर्व माध्यमिक येथे वृक्षारोपणप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक जे.एम्.टेंभरे, सहायक शिक्षक ए.यु.सावरकर टी.पी.काशीवार, एस.यु.बांबोळे, सौ.व्ही.डी.राऊत प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज लोहारा येथे वृक्षारोपणप्रसंगी महाविद्यालयाचे संचालक राजू मडामे, प्राध्यापक वृंद, विद्यार्थी आणि शिक्षक सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिवाजी पूर्व माध्यमिक धवलखेडी येथे वृक्षारोपण प्रसंगी शिक्षक सेनेचे पदाधिकारी, शिवसेना विधानसभा संघटक राजीक खान, ओबीसी सेना तालुका अध्यक्ष दीनदयाल मेश्राम, उपसरपंच सौ. कुसुम सोनबोईर, मुख्याध्यापक के.सी.चौव्हान, सहायक शिक्षक एस.बी. लांजेवार, व्ही.ए.उके, व्यवस्थापन समिती अध्यक्ष यशवंत उईके, शामराव नेताम, मिरा कुंजाम, इमला सलामे प्रामुख्याने उपस्थित होते.

महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय आणि ग्राम पंचायत पालान्दूर/जमी. येथे वृक्षारोपण प्रसंगी शिवसेना व शिक्षक सेना पदाधिकारी, शाळेचे प्राचार्य जी.एम.जनबंधू, प्रा. सी.टी.झंजाळ, प्रा. एस.टी. ठलाल, सहा. शिक्षक आर. एम. गुरनुले, बी. ए. कठाने व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. सिद्धार्थ हायस्कूल तथा कानिष्ठ महाविद्यालय डवकी येथे वृक्षारोपण प्रसंगी प्राचार्य व संचालक एम.सी. मेश्राम, जिल्हाध्यक्ष अनिल कुर्वे, जिल्हा सरचिटणीस सी.टी. झंजाळ, तालुकाध्यक्ष सुभाष दुबे, सहा. शि. जे.टी. ठवरे, व्ही. टी. पटले, बी.डी. चव्हाण, नरेश निखारे, सौ. ए. एस. मारबते, बी.बी. कुलसुंगे, पी.जी.लांजेवर, एम. जे. टेंभरे, कार्तिक कोकावार आणि शाळेतील विद्यार्थी मोठया संखेने उपस्थित होते.
शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे सेनेचे गोंदिया जिल्हाध्यक्ष अनिल कुर्वे यांनी आभार व्यक्त करुन प्रत्येक विद्यार्थ्यांनी दरवर्षी आपल्या वाढदिवशी किमान एक तरी रोपटे आवर्जून लावावे आणि त्याचे संगोपन करावे असे सर्व शाळेतील विद्यार्थांना आवाहन केले.

Print Friendly, PDF & Email
Share