मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘प्रेरणा दिवस’ म्हणून साजरा
देवरी 25: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘प्रेरणा दिवस’ म्हणून दिनांक १५ जूलै ते ३० जूलै या कालावधीत राज्यात १० लाख रोपटे लावून वृक्षारोपण शिव पंधरवाडा साजरा करण्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांचे नेतृत्वाखाली, कार्याध्यक्ष नितीन चौधरी आणि नागपूर विभागीय अध्यक्ष गंगाधर नाकाडे यांचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेकडून नियोजन केले आहे. याच अनुषंगाने शिक्षक सेना जिल्हा गोंदियाच्या वतीने शिवाजी पूर्व माध्यमिक धवलखेडी येथे वृक्षारोपण करुन प्रेरणा दिवसशिक्षक सेना जिल्हाध्यक्ष अनिल कुर्वे यांचे प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
याप्रसंगी शिक्षक सेनेचे जिल्हा सरचिटणीस चेतककुमार जंजाळ, शिवसेना विधानसभा संघटक राजीक खान उपसरपंच सौ. कुसुम सोनबोईर, मुख्याध्यापक के.सी.चौव्हान, सहायक शिक्षक एस.बी. लांजेवार, व्ही.ए.उके, व्यवस्थापन समिती अध्यक्ष यशवंत उईके, शामराव नेताम, मिरा कुंजाम, इमला सलामे प्रामुख्याने उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.