वन संवर्धन दिनी नेफडो तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम

प्रहार टाईम्स
देवरी 23:
स्थानिक देवरी येथे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नेफडो शाखा देवरी च्या वतीने प्रभाग क्रमांक 16, परसोला डेपो देवरी येथे वृक्षारोपण करून वनसंवर्धन दिन साजरा करण्यात आला तसेच त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार करण्यात आला.यावेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा देवरी चे उपाध्यक्ष – सचिन भांडारकर, सचिव -इंजि. प्रीती नेताम, कोषाध्यक्ष – इंजि. विक्की चौधरी, प्रसिद्धीप्रमुख- समीर साखरे, तसेच सोमन चव्हाण, खुशबू दशरिया, रक्षा रामटेके, पूजा यावलकर, साक्षी जवेरी व रितेश पद्मे आधी सदस्य व निसर्गप्रेमी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share