अखेर शाळा सुरु होणार …. सुरक्षतेची जबाबदारी शाळांवर

शासनाच्या शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सुचना जारी

डॉ. सुजित टेटे/ प्रहार टाईम्स
गोंदिया,११ : कोरोना विषाणुचा प्रभाव राज्यात वाढल्यामुळे राज्यभरातील शाळा गेल्या ८ महिन्यांपासून बंद होत्या. मात्र आता २३ नोव्हेंबर २०२० पासून नववी ते बारवीचे वर्ग सुरु होणार आहेत. संपूर्ण राज्यातील शाळा जवळपास ८ महिन्यानंतर सुरु होणार असून त्यासाठी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या असुन त्यानुसार विद्यार्थ्यांची संपूर्ण जबाबदारी शिक्षक आणि शाळांवर टाकण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहण्यापूर्वी पालकांकडून लेखी परवानगी घ्यावी मागविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पालकांनी आपल्या स्वतःच्या वाहनात विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने संपूर्णपणे आपली जबाबदारी झटकुन शिक्षक आणि शाळांना यासाठी जबाबदार असल्याचे जीआरमध्ये देण्यात आलेल्या मार्गदर्शन सूचनानुसार स्पष्ट होते. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी शाळांवर टाकली असल्यामुळे राज्यातील शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कोरोनाचा प्रभाव राज्यात वाढल्यामुळे राज्यभरातील शाळा गेल्या ८ महिन्यांपासून बंद होत्या. मात्र आता २३ नोव्हेंबर २०२० पासून नववी ते बारवीचे वर्ग सुरु होणार आहे. या शाळा कशा चालणार ? कोणत्या सुरक्षेच्या तयारी शाळांना कराव्या लागतील यासाठी शिक्षण विभागाने संपूर्ण मार्गदर्शक सुचना तयार केल्या आहेत. शाळा सुरु करण्याआधी संपूर्ण परिसराचे निर्जन्तुकरण करण्यात येईल. शाळांमध्ये विद्यार्थी आल्यावर त्याना सफाईसाठी आवश्यक ते साबण, सैनीटायझार ,हात धुण्यासाठी जागा विद्यार्थ्यांना शाळांनी उपलब्ध करुन द्यावी. शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार विद्यार्थ्यांची सर्व जबाबदारी शाळांची असणार आहे. त्याचप्रमाणे पालकांकडून लेखी पत्र देण्याची अट यावेळी विद्यार्थ्यावर लादन्यात आल्यामुळे शिक्षण विभागाने कोरोना विरुद्धची लढाई अर्ध्यात सोडल्याचे यावेळी समजते.
शाळा सुरू करण्याच्या मार्गदर्शक सुचना

1) विद्यार्थ्यांची दररोज आरोग्य तपासणी

2) पालकांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या वाहनाने सोडावे

3) शाळेच्या बसचे निर्जंतुकीकरण

4) शिक्षकांना कोरोना निगेटिव्ह असल्याचे अहवाल सादर करावे लागणार

5) शिक्षकांचे कार्यगट स्थापन होणार

6) वर्गात आणि कार्यालयात सोशल डिस्टन्स आवश्य्क

7) एका बाकावर एकच विद्यार्थी आणि मास्क आवश्यक

8) गर्दी होणार नाही याची दक्षता घेणे

9) पालकांची परवानगी आवश्यक

10) विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिति बंधनकारक नाही

11) पूर्ण उपस्थितिची सक्ती नको

12)कर्मचाऱ्यांना इतर कामेदेखील करावी लागणार

असे अनेक मार्गदर्शक सूचना शासनाने ठरवून दिलेल्या आहेत.

Share