भडंगा येथील वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृतक परिवाराला वनविभागातर्फे एक लाखाचा धनादेश
गोरेगाव 22: भडंगा येथील पूणा मोहन मेश्राम यांची वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पींडकेपार जंगल परिसरामध्ये झाली. त्यामुळे पूणा मोहन मेश्राम यांचा परिवारावर अतिशय दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यांच्या परिवारामध्ये पत्नी व पती असे दोघेच सोबत राहत होते आणि कुटुंबातील कमावणारा व्यक्ती गमावल्याने सदर परिवारावर मोठे संकट ओढवले असल्याने त्या परिवाराला आर्थिक मदत म्हणून वनविभागातर्फे 1 लाखाची मदत चेक स्वरूपात म्हणून करण्यात आली.
वनविभागातील प्रमुख कर्मचारी प्रवीण साठवणे, विक्की लांजेवार व वनविभागातील ईतर बरेच कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी गावातील सरपंच शारदा उके उपसरपंच उमाकांत मोटघरे, ग्रामपंचायत सदस्य खुटमोडे तसेच गोरेगाव पं. स. सभापती विश्वजित डोंगरे, व गावातील प्रतिष्ठित नागरिक नरेन्द्र पटले, हेमंत मस्करे , संपता बाई मंडिये व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.