जिल्हातील 17 शाळेतील 70 शिक्षक ऑगस्ट पासून वेतनविना

प्रहार टाईम्स

गोंदिया -10 दिवाळी अवघ्या 4 दिवसावर येवून ठेपली मात्र राज्यातील व जिल्ह्यातील 1901 या हेड ल्कली वेतन घेणार्‍या शाळेतील कर्मचार्‍यांना ऑगस्ट महिन्यापासून वेतन मिळाले नाही. जिल्हातील या 17 शाळेतील 70 शिक्षक व कर्मचारी यांना दिवलीच्या आधी वेतन देऊन यांची दिवाळी गोड व्हावी अशी अपेक्षा आहे.

तीन महिन्यापासून वेतन नसल्याने सर्व कर्मचार्‍यांचे आर्थिक नियोजन ढासळलेले आहे.

आदिवासी विकास विभागाच्या अनुदानातून गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्जाचे कर्जाचे हफ्ते थकीत झालेले आहेत, विम्याचे हफ्ते भरता येत नाही आणि इतर खर्चाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

1901 या हेड अंतर्गत येणार्‍या माध्यमिक शाळांचे वेतन केले जाते . गेल्या 13 वर्षापासून वेतनचा पेच सुटत नाही. दरमहिन्याला या हेड अंतर्गत येणार्‍या शिक्षकांना नियमित वेतन एवढीच अपेक्षा सदर शिक्षक करीत आहेत. सदर शिक्षकांचे वेतन आदिवासी विकास विभागाकडून मंजूर करून शालेय शिक्षण विभागाकडे वर्ग केले जाते . त्यावर वित्त विभागाची मंजूरी मिळाल्यावर निधि शालेय शिक्षण संचालक यांना दिली जाते.

शिक्षण संचालक वेतन पथकाच्या मागणी नुसार वेतन निधी रिलीज करतात तेव्हाच कर्मचार्‍यांना वेतन पथकाच्यामार्फत मिळत असतो. आदिवासी विकास विभाग अंतर्गत अनुदानावर आलेल्या आदिवासी क्षेत्रातील माध्यमिक शाळा यापूर्वी दोन वर्षात वेतनसाठी कायमस्वरूपी शालेय शिक्षण विभागाकडे वर्ग झाल्या आहेत. मात्र 1901 या हेड खाली असलेल्या शाळेतील कर्मचार्‍यांचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.

Share