नयना गुंडे यांनी जिल्हाधिकारी पदाचा स्विकारला पदभार

गोंदिया 13 : श्रीमती नयना अर्जुन गुंडे यांनी 12 जुलै (मध्यानानंतर) रोजी गोंदिया जिल्हाधिकारी पदाचा
कार्यभार स्विकारला.
श्रीमती गुंडे यांनी बी.ए. (राज्यशास्त्र) 1988 मध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून प्रथम क्रमांकाने प्राप्त
केले. त्यानंतर 1990 मध्ये एम.ए. (राज्यशास्त्र) पुणे विद्यापीठातून स्वर्ण पदक प्राप्त. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून
जून 1992 ते जून 1994 पर्यंत उस्मानाबाद येथे परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी पदावर कार्य. त्यानंतर नाशिक
जिल्हाधिकारी कार्यालयात जून 1998 पर्यंत विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून कार्य.
सन 1999 ते 2000 पर्यंत सोलापूर येथे उपविभागीय अधिकारी म्हाडा येथे कार्य. 2000 ते मार्च 2004 मध्ये
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून कार्य. 2004 ते जून 2006 मध्ये सोलापूर
जिल्हाधिकारी कार्यालयात पुनर्वसन अधिकारी म्हणून कार्य. जून 2006 ते मार्च 2007 पर्यंत नाशिक जिल्हाधिकारी
कार्यालयात विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून कार्य. 2007 मध्ये अप्पर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती.
2007 ते 2012 मध्ये नाशिक येथे म्हाडाचे मुख्याधिकारी पदावर कार्य. 2012 ते 2015 मध्ये नाशिक येथे
उपमहानिरीक्षक (नोंदणी) पदावर कार्य. ऑगस्ट 2015 ते जून 2016 मध्ये नागपूर येथे अतिरिक्त नगरपालिका
आयुक्त म्हणून कार्य. 2016 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती. जून 2016 ते फेब्रुवारी 2018 पर्यंत जिल्हा
परिषद वर्धा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्य. फेब्रुवारी 2018 ते मार्च 2020 पर्यंत पुणे महानगर
परिवहन मंडळ लिमिटेड मध्ये चेअरमेन व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्य. मार्च 2020 पासून ते जुलै 2021
पर्यंत यशदा, पुणे येथे उपमहासंचालक पदावर कार्य.
जिल्हाधिकारी नयना गुंडे यांना जानेवारी 2020 मध्ये पुणे महानगर परिवहन मंडळ लिमिटेडमध्ये बसेसच्या
किलोमीटर प्रती लिटरमध्ये वाढ करण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाकडून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. वर्धा जिल्हा
परिषदेत कार्यरत असतांना केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दोन राष्ट्रीय पुरस्कार
प्राप्त. नागपूर महानगरपालिकेत कार्यरत असतांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्रीय शहरी विकास मंत्रालयातर्फे
राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

Share