झोपलेल्या मोदी सरकार ला जगविन्यासाठी सायकल रैली

तालुका काँग्रेस च्या वतीने देवरी येथे वाढत्या महागाईच्या विरोधात सायकल रैलीचे आयोजन

देवरी 13: केंद्र सरकार व भारतीय जनता पार्टिच्या मोदी सरकार द्वारे सतत वाढणाऱ्या पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस व जीवनावश्यक वस्तु चे दर कमी झाल्या पाहिजे या मागणीला धरून तालुका काँग्रेस च्या वतीने देवरी येथे सायकल रैली काढण्यात आली आहे. आज इथे वाढत्या महागाईच्या निषेध करण्यासाठी सर्व स्तरावरिल लोक इथे उपस्थित आहेत. खरे पाहता पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस व जीवनावश्यक वस्तुचे दर वाढि मुळे सर्वाचे कम्बरड़े मोडले आहेत. वाढत्या इंधनच्या दरामुळे देशातील सम्पूर्ण जनता यात विशेषता शेतकरी वर्ग हा भारतीय जनता पार्टिच्या विरोधात खुप रोषा मध्ये आहे. वाढत्या महागाई च्या विरोधात केंद्र सरकारला कितीही बोलले किंवा कितीही आंदोलान केले तरी ही केन्द्राची मोदी सरकार कोणाची ही ऐकत नाही अशा गूंगी व बहरी आणि झोपलेल्या मोदी सरकारला जगविन्यासाठी सायकल रैली चे आयोजन करण्यात आले.

देवरी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या सूचने नुसार देवरी तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने सोमवार(ता.१२ जुलै) रोजी देशात दररोज वाढत असलेल्या पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस व जीवनावश्यक वस्तु दरात विरोध आणि या दरवाढिचा निषेध करण्याकरिता आमदार कोरोटे यांच्या नेतृत्वात सायकल रैलीचे आरोजन करण्यात आले.

ही सायकल रैली आमदार कोरोटे यांच्या भवनातून निघुन, श्री अग्रेसन चौक, राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरुण भ्रमण करित मोदी सरकाच्या विरोधात घोषणा देत देवरीच्या तहसील कार्यालय परिसरात पोहचुन उपविभागीय अधिकारी देवरी यांचे प्रतिनिधि तहसीलदार विजय बोरुडे यांच्या मार्फत सतत वाढनारी महागाई कमी करा या मांगनी संदर्भात देशाचे महामहिम राष्ट्रपति यांचे नावे निवेदन दिले.

सायकल रैली व निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात आमदार सहषराम कोरोटे, गोंदिया जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष रत्नदीप दहिवले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप भाटिया. जिल्हा महिला काँग्रेस चे अध्यक्ष उषाताई शहारे, तालुका अध्यक्ष सुभद्रा अगड़े, माजी जि.प.सदस्य माधुरिताई कुंभरे, जिल्हा काँग्रेस चे महासचिव बळीराम कोटवार, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष शकील कुरैशी, शहर अध्यक्ष कुलदीप गुप्ता, माजी नगरसेवक ओमप्रकाश रामटेके, सक्रिय कार्यकर्ता जयपाल प्रधान, छगनलाल मुंगनकर, फुटानाचे सरपंच नूतन बंसोड़, ओमप्रकाश शाहु, प्रल्हाद सलामे, शार्दूल संगिड़वार, संदीप मोहबिया, राजेश गहाने, राज भाटिया, प्रशांत कोटांगले, अमित तरजुले, अरुण जमदाळ, नरेश राऊत, सुरेंद्र बंसोड़, कमलेश पालिवाल यांच्या सह देवरी तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्याचा समावेश होता.

Print Friendly, PDF & Email
Share