Impact : बातमी प्रकाशित होताच नगरपंचायतीला आली जाग, नाल्यावर झाकण लावण्याचे काम सुरु..!

‘नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे अपघातांना आमंत्रण’ मथड्याखाली बातमी झाली होती प्रकाशित….

डॉ. सुजित टेटे | प्रहार टाईम्स

देवरी 12: नगरपंचायत देवरी च्या दुर्लक्षामुळे मागील 1 महिन्यापासून नाल्यावरील झाकण उघडे ठेवल्यामुळे रहदारीच्या रस्त्यावर गंभीर अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. महिनाभर वाट बघून सुद्धा याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.

अखेर नाईलाजाने प्रहार टाईम्स मध्ये वृत्त प्रकाशित झाले आणि नगरपंचायत ऍक्शन मोड मध्ये आली. सध्या नाल्यावरील झाकण झाकण्याचे काम सुरु झालेले आहे. यामुळे रहदारीच्या रस्त्यावरचा धोका काहीशा कमी झालेला दिसून येतो.

रस्ते , कचरा विल्हेवाट या गोष्टीकडे जनतेचे नजरा अजूनही टिकूनच आहेत. नक्कीच जनहितार्थ नगरपंचायत प्रशासन याकडे लक्ष देणार अशी सर्व सामान्य जनतेची अपेक्षा आहे.

Share