अबॅकसच्या 10 व्या राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धेत चमकले देवरीचे विद्यार्थी..

देवरी 11: शाळा बंद असल्यातरी अभ्यासात आणि मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शाळा आणि विविध शिकवणी वर्ग ऑनलाईन तंत्रज्ञानाचा वापर करून विविध स्पर्धा आयोजित करतात आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत . त्यामुळे अध्ययनार्थ्याच्या अध्ययनामध्ये ज्ञानाचे भर पडत असून येणाऱ्या काळातील समस्या पेलविण्यासाठी त्यांना या स्पर्धांची नक्कीच मदत मिळेल.

अशीच एक स्पर्धा UCMAS अबॅकस अकेडमीने 10 वी राज्यस्तरीय स्पर्धा दि. 22 एप्रिल ते 24 एप्रिल 2021 ला आयोजित करण्यात आलेली होती या स्पर्धेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आलेला असून यामध्ये देवरी तालुक्यातील अबॅकस केंद्राच्या संचालिका प्रगती प्रभाकर मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांची यादी खालील प्रमाणे आहे.

चॅम्पियन ठरलेले विद्यार्थी : श्रुती मारकाम , लावण्या मानकर , अर्णव डोंगरे

द्वितीय आलेले विद्यार्थी :
निधी राऊत , ब्लॉसम पब्लिक स्कुल
आराध्या कानतोडे , ब्लॉसम पब्लिक स्कुल

तृतीय :
सान्वी आकरे , ब्लॉसम पब्लिक स्कुल
आरव अग्रवाल , ब्लॉसम पब्लिक स्कुल

मेरिट आलेले विद्यार्थी :
प्रियांत बोगे , ब्लॉसम पब्लिक स्कुल
आर्या रामटेके , ब्लॉसम पब्लिक स्कुल
सुजल असाटी , ब्लॉसम पब्लिक स्कुल

हर्षल शहारे , न्यू सीता पब्लिक स्कुल
हिमांशू डोंगरे , न्यू सीता पब्लिक स्कुल

विशेष सहभाग :
जीविका कांगणे , ब्लॉसम पब्लिक स्कुल
आकांशा डोये , न्यू सीता पब्लिक स्कुल

सर्व यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा आज सत्कार करण्यात आलेला असून त्यांना सन्मान चिन्ह , मेरिट प्रमाणपत्र आणि निकाल देऊन गौरविण्यात आलेला आहे.

यावेळी सर्व विद्यार्थी , पालक आणि अबॅकस केंद्राचे शिक्षक उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांचा अभिनंदन केला

Print Friendly, PDF & Email
Share