या अभिनेत्रींच्या आजीचे झाले निधन

बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री अनन्या पांडेची आजी व अभिनेता चंकी पांडे यांची आई डॉ. स्नेहलता पांडे यांचे शनिवारी मुंबईतील त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गेले. चंकी आणि त्यांच्या आईमध्ये खूप छान बाँडिंग होते. आईच्या निधनामुळे चंकी यांना अतीव दुःख झाले आहे.

चंकी यांच्या आईचे निधन नेमके कोणत्या कारणाने झाले, याचा तपशील अद्याप मिळालेला नाही. दरम्यान, चंकी आणि त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आणि त्याच्या आईचे अंत्यदर्शन घेण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकार गेले. चंकी पांडे आणि भावना पांडे यांच्या जवळचे असलेले अभिनेता समीर सोनी आणि अभिनेत्री नीलम हे पांडे हाऊसमध्ये गेले होते.

Print Friendly, PDF & Email
Share