पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक : गृहमंत्री आणि संरक्षणमंत्री असणार उपस्थित

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : दहशतवाद्यांनी प्रथमच ड्रोनचा वापर करून रविवारी पहाटे जम्मू विमानतळावरील भारतीय हवाई दलाच्या तळावर बॉम्बहल्ला केला. त्यांच्या स्फोटात हवाई दलाचे दोन अधिकारी जखमी झाले. या प्रकरणाची केंद्राने गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सायंकाळी ४ वाजता उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीचा अजेंडा काय असेल हे अद्याप समजू शकलेले नाही, परंतु यात अनेक विषयांवर चर्चा होऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे. देशाच्या सुरक्षेशी संबंधित अनेक बडे अधिकारीही या बैठकीत भाग घेतील. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमधील हवाई दलाच्या तळावर झालेल्या हल्ल्याबद्दलही चर्चा होऊ शकते. हवाई दलाच्या तळावर हल्ला झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील सर्व सुरक्षा संस्था सतर्क करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

Share