खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने नगर परिषद विकास कामासंदर्भात मंत्रालयात बैठक !

भंडारा 29: जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायतच्या विकास कामासंदर्भात नगर विकास मंत्री यांच्या उपस्थित मंगळवारी (दि.२९) दुपारी ३ वाजता महाराष्ट्र रस्ते विकास विकास महामंडळ कार्यालय मलबार हिल येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत या दोन्ही जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतच्या विकास कामासंर्भात चर्चा करुन ती मार्गी लावण्यात येणार आहे. या बैठकीला खासदार प्रफुल्ल पटेल, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव, दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकारे ही बैठक आयोजित करण्यात आली असून यात दोन्ही जिल्ह्यातील विकास कामे मार्गी लावण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share