देवरी येथे माजी आमदार दिलीप बंसोड यांचा सत्कार

आमदार कोरोटे भवनात सत्कार सोहळ्याचे आयोजन

देवरी, ता.२७: आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे व देवरी तालुका काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातुन नुकतेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश करणारे तिरोडाचे माजी आमदार दिलीपभाऊ बंसोड़ यांचे पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रथमच देवरी शहरात आगमना पित्यर्थ त्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन देवरी येथे आमदार भवनात शुक्रवारी(ता.२५ जून) रोजी करन्यात आले होते.
या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार सहषराम कोरोटे हे होते.

या प्रसंगी सत्कार मूर्ति माजी आमदार दिलीपभाऊ बंसोड़ यांच्या सह गोंदिया काँग्रेस चे युवा नेते अशोक(गप्पू) गुप्ता, शेतकरी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष जितेश राणे, तिरोडा काँग्रेस चे शहर अध्यक्ष ठामसिंग चौव्हान, माजी जि.पं.सदस्य उमेन्द्र चौरागड़े, गोंदिया काँग्रेस चे नेते राजकुमार(पप्पू) पटले यांचा सत्कार आमदार सहषराम कोरोटे व देवरी तालुकाध्यक्ष संदीप भाटिया यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ भेट देवुन करण्यात आले.

यावेळी गोंदिया जिल्हा काँग्रेस चे कार्याध्यक्ष रत्नदीप दहिवले, गोंदिया जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषाताई शहारे, माजी तालुका अध्यक्ष राधेश्याम बगड़िया, आमगांव तालुकाध्यक्ष संजय बहेकार, सालेकसा तालुकाध्यक्ष वासुदेव चूटे, देवरी तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष सुभद्राताई अगड़े, सालेकसा तालुका महिला अध्यक्ष लताताई दोनोडे, तालुका महासचिव बळीराम कोटवार, माजी नगरसेवक ओमप्रकाश रामटेके, जि.प.चे माजी समाजकल्याण सभापती राजेश नंदागवळी, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष शकील कुरैशी, शहर अध्यक्ष कुलदीप गुप्ता, सामाजिक कार्यकर्ता सीमाताई कोरोटे, छगनलाल मुंगनकर, शार्दूल संगिड़वार यांच्या सह देवरी तालुक्यातील अनेक सरपंच, उपसरपंच, काँग्रेस पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते महिला, पुरुष आणि युवक वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.

या प्रसंगी सत्कार मूर्ति माजी आमदार दिलीपभाऊ बंसोड़, कार्याध्यक्ष रत्नदीप दहिवले व आमदार सहषराम कोरोटे यांनी पक्ष संघठन कशाप्रकारे बळकट करता येईल या विषयी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप भाटिया यांनी तर संचालन अविनाश टेम्भरे यांनी आणि उपस्थितांचे आभार शकील कुरैशी यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share