काय सांगता! आता केवळ आवाजाने चार्ज होणार MI चा स्मार्टफोन

बंगलोर: Xiaome कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांची गरज लक्षात घेऊन स्मार्टफोनमध्ये वेगवेगळे फिचर्स आणत असते. यामुुळे ग्राहक देखील Xiaome च्या स्मार्टफोन्सला पसंती दर्शवतात. अशातच आता या लोकप्रिय कंपनीने आणखी एक कारनामा केला आहे. फक्त आवाजाने स्मार्टफोन्स आणि इतर गॅजेट्स चार्ज होऊ शकतील, अशी टेक्नॉलॉजी कंपनीने शोधली आहे.

Xiaome कंपनीने या टेक्नॉलॉजीसाठी China National Intellectual Property Administration कडे पेटंट फाईल केलं आहे. ही टेक्नॉलॉजी आवाजातील कंपने alternative current मध्ये रूपांतरित करते. त्यानंतर alternative current डीसी पॉवरमध्ये रूपांतरित होऊन स्मार्टफोन चार्ज होतो. या टेक्नॉलॉजीमध्ये ऊर्जा साठवून ठेवण्याच्या मॅकॅनिजमचा वापर करण्यात आला आहे.

Xiaome कंपनीने यापुर्वी देखील अशीच एक टेक्नॉलॉजी शोधून काढली होती. Mi Air Charge असं या टेक्नॉलॉजीचं नाव होतं. Mi Air Charge टेक्नोलॉजीद्वारे स्मार्टफोनला मिलीमीटर लहरी पोहोचतात आणि या लहरी इलेक्ट्रिक पॉवरमध्ये रूपांतरित होऊन फोन चार्ज करतात.

दरम्यान, Xiaome कंपनीने सध्या सादर केलेली टेक्नॉलॉजी व्यवसायिकरित्या जगासमोर आलेली नाही. कंपनीने हे पेटंट फाईल केल्यापासून अनेक लोक फक्त आवाजाने चार्ज होणाऱ्या स्मार्टफोन्सची आतुरतेने वाट पाहत आहेत. या हटके चार्ज सिस्टीमचे मोबाईल्स बाजारात केव्हा येणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

Share