मोदी सरकार सर्व बाबतीत अपयशी- आ. कोरोटे
देवरी येथे काँग्रेस पक्षाचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून साजरा
देवरी १९ : ज्या वेळी या देशात मनमोहन सिंग यांची सरकार होती. त्यावेळी जीवनावश्यक वस्तु, घरगुती गॅस पेट्रोल, डिसेल व बेरोजगारी ही नियंत्रणात होती. परंतु जेव्हा पासून या देशात नरेंद्र मोदी यांची सरकार केंद्रात आली. तेव्हापासून या देशात जीवनावश्यक वस्तु, घरगुती गॅस, पेट्रोल, डिसेल ची दरवाढ व बेरोजगारी सतत वाढत आहे. त्यामुळे या देशातील, शेतकरी, शेतमजूर मध्यमवर्गीय व सर्व सामान्य गरीब जनता या सरकार मुळे त्रस्त झाले आहेत. अशाप्रकारे सर्व बाबतीत केन्द्राची मोदी सरकार अपयशी असल्याचे प्रतिपादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या निर्देशनानुसार तालुका काँग्रेस च्या वतीने काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात आला. या वेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करतांनी बोलत होते.
या संकल्प दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सहषराम कोरोटे हे होते.
या प्रसंगी देवरी तालुका काँग्रेस चे अध्यक्ष संदीप भाटिया, उपाध्यक्ष चैनसिंग मडावी, तालुका महासचिव बळीराम कोटवार, माजी तालुका अध्यक्ष राधेश्याम बगड़िया, घोनाडीचे सरपंच सोनू नेताम, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष शकील कुरैशी, शहराध्यक्ष कुलदीप गुप्ता, वैभव जैन, वरिष्ठ कार्यकर्ता नर्मदाप्रसाद शर्मा, माजी नगरसेवक ओमप्रकाश रामटेके, रामेश्वर बहेकार, प्रशांत कोटांगले, ओंकार शाहु, सुरेंद्र बंसोड़, छगनलाल मुंगनकर, नरेश राऊत, देवरी तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष सुभद्राताई अगड़े, निर्मला मडावी, प्रभा बहेकार, पारेखा कोडवते, उज्वला कोचे, तारा टेम्भूरकर, दिलीप परिहार, नीलेश शाहु, सलामे ताई, कैलाश देशमुख, अविनाश टेम्भरे, प्रल्हाद सलामे, संजोग नरवरे,अमित तरजुले, कमलेश पालीवाल यांच्या सह देवरी तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर आमदार कोरोटे यांच्या भवनातून एक मोर्चा काढून केन्द्रातील मोदी सरकार च्या विरोधात घोषणाबाजी करीत येथील तहसीलदार कार्यालयासमोर नेण्यात आले.
देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांच्या मार्फत देशाचे राष्ट्रपती यांच्या नावे वाढती जीवनावश्यक वस्तु चे दर, वाढते ईंधन दर, वाढती घरगुती गॅस च्या किंमती ,वाढती बेरोजगारी त्वरित आटोक्यात आणण्यासंबंधात एक निवेदन सादर करन्यात आले. तहसील कार्यालयासमोर मोदी सरकारचे कृषि विरोधी काळे कायदे च्या संदर्भात पोस्टर जाळुन मोदी सरकार चा निषेध करण्यात आला.