अन् संजय दत्त अचानक पोहोचला मंत्री नितीन राऊत यांच्या घरी!

नागपूर : अभिनेता संजय दत्तने राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट घेतली आहे. नितीन राऊत यांच्या नागपूर येथील बेझनबाग निवासस्थानी संजयने संपूर्ण कुटुंबाची भेट घेतली.

संजय दत्तने शनिवारी अचानक नागपूरला जाऊन नवदाम्पत्याची भेट घेतली. राऊतांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहू न शकल्यामुळे संजय दत्तने ही सदिच्छा भेट घेतल्याची माहिती आहे.

https://m.facebook.com/prahaartimes

कुणाल आणि आणि त्यांची पत्नी आकांक्षा यांना संजयने विवाह प्रित्यर्थ शुभेच्छा दिल्या. या छोटेखानी भेटीत त्याने राऊत कुटुंबियांशी मनमोकळ्या गप्पा देखील मारल्या. संजय दत्तचे पिता अभिनेते सुनील दत्त हे काँग्रेसचे माजी खासदार होते. तर त्याची मोठी बहीण प्रिया दत्तनेही काँग्रेसकडून खासदारकी भूषवली आहे. त्यामुळे दत्त कुटुंबीयांचे काँग्रेस नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

डॉ. नितीन राऊत यांचे सुपुत्र कुणाल राऊत फेब्रुवारी महिन्यात विवाहबंधनात अडकले. मात्र 21 फेब्रुवारी 2021 रोजी आयोजित स्वागत समारंभ कोव्हिड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला होता.

Share