कडक सॅल्यूट : पोलीस स्टेशन जारावंडी येथे ‘पोलीस दादा खिडकी’चे उदघाट्न

प्रहार टाईम्स
प्रतिनिधी / जारावंडी :
आदिवासी बहुल, अतिसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त, छत्तीसगड सीमेलगत असलेल्या एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख (प्रशासन ), अपर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया (अभियान ) यांच्या आदेशाने तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती पेंढरी कॅम्प कारवाफा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन जारावंडी येथे काल ५ जुन रोजी ‘पोलीस दादा खिडकी’ चे उदघाट्न पोलीस निरीक्षक अभय आष्टेकर यांचे हस्ते करण्यात आले. उदघाट्न प्रसंगी जारावंडी पोस्टे चे पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे सो. व सर्व पोलीस अंमलदार तसेच जारावंडी येथील प्रतिष्ठित नागरिक हजर होते.


गडचिरोली जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या प्रोजेक्ट प्रगती कार्यक्रमांतर्गत पोलीस स्टेशन जारावंडी कडून कृषी विभागाच्या सर्व योजना, अपंग बस सवलत कार्ड, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, अटल दिव्यांग स्वावलंबन मिशन योजना, बालसंगोपन योजना, तसेच विविध शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणार आहे. तसेच आधार कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, जॉब कार्ड, राशन कार्ड तसेच मोफत झेरॉक्स व ऑनलाईन फॉर्म भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर ची माहिती परिसरातील नागरिकांना सांगून जास्तीत जास्त नागरिकांनी या खिडकीचा लाभ घेण्याबाबत आवाहन करण्यात आले तसेच शासकीय योजना कागदपत्रे आणी शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याची पोलीस दादा खिडकी ही हक्काची जागा असलेबाबत आष्टेकर पोलिस निरीक्षक यांनी परिसरातील नागरिकांना सांगितली.


सदर कार्यक्रमाच्या वेळी जारवंडीचे पोलीस निरीक्षक अभय आष्टेकर,पोलीस उपनिरीक्षक, दामोदर काळे,पोलीस अंमलदार यादव औरसे, गणेश आंधे,सुधाकर ईस्टाम, मनिराम दुग्गा, नेताजी कावळे, सुभाष बारगजे, नागनाथ केंद्रे, रवींद्र तुलावी, गुरूदास मडावी, ठकचंद भसारकर,मीनाक्षी गौतम,कल्पना नैताम, ललिता कुमरे, शिल्पा पोटे आदी पोस्टे अंमलदार उपस्थित होते.

Share