आमदार सहसराम कोरोटे यांनी उपलब्ध करूण दिले धानासाठी गोदाम


देवरी 3- आमगाव-देवरी विधानसभा मतदार संघाचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या प्रयत्नांनी चिचगडचे शासकीय गोदाम व ककोडी, पुराडा, बोरगाव (बा.), कडीकसा पालांदूर(जमी.) येथील आश्रमशाळेच्या रिक्त इमारती उपलब्ध करुन दिल्याने परिसरातील शेतक-यांना मोठा धीर मिळाला आहे.

गेल्या वर्षी धान खरेदी केंद्रांनी खरेदी केलेल्या धान मिलींग च्या दराबाबत धान मिलर्स व सरकार यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे यंदा रब्बी पिकाच्या खरेदीसाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे धान खरेदी केंद्रातून धान खरेदी करने बंद होते.
सरकार आणि धान खरेदी संस्था व आदिवासी महामंडळ यांच्यात परस्पर भांडण झाल्याने महामंडळाच्या गोदामांमध्ये खरीप धान भरला गेल्याने यावर्षी महामंडळाने धान खरेदी थांबविल्यामुळे परिसरातील शेतकरी निराश झाले होते . या बाबत पुढाकार घेऊन आमदार कोरोटे यांनी आदिवासी महामंडळाचे उप प्रशासक यांच्याशी भेट घेऊन त्या शेतक-यांनवर होणा-या अडचणींची जाणीव करून दिल्यानंतर चिंचगड येथील शासकीय गोदामे व तालुक्यातील सर्व आश्रमशाळांची रिक्त असलेले भंडार कक्ष धानासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासंदर्भात धान संकलनासाठी प्रकल्प अधिकारी देवरी यांच्याशी चर्चा केल्यानंतर विधान सभा क्षेत्रातील सर्व आश्रम शाळा यांनी रिक्त असलेले स्टोरेज रूम व वर्ग कक्ष उपलब्ध करुन दिले आहे.
आमदार सहषराम कोरोटे यांनी केलेल्या प्रयत्नातून आता धान खरेदी सुरू होईल या आशेने परिसरातील शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Share