एवढीशी सौफ काम करी चोख
सौफ आपल्या सर्वांच्या घरात राहणारी आणि सर्वांना परिचित असणारी वस्तू आहे. आपल्यापैकी अनेकांना जेवण किंवा नाष्टा झाल्यावर सोफ खाण्याची सवय आहे. बरेच जण सोफचा वापर मसाल्यामध्ये सुद्धा करतात. चला तर जाणून घेऊया या सौफचे फायदे…
१) जेवण केल्यानंतर सोफ खाल्याने पचनक्रिया सुधारते. जर तुम्हाला अपचनाची समस्या असेल तर तुम्ही बडीशेप पाण्यात उकळून खडीसाखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा खावी. यामुळे अपचन आणि आंबट ढेकरा येणं लगचे बंद होईल.
२) सोफ खाल्यामुळे मुखदुर्गंधी कमी होते.
३) ज्या मुलींना किंवा महिलांना मासिक पाळी (पिरीयड) अनियमित येत असेल तर सौफ आणि गूळ खाल्ल्याने पीरियड म्हणजे मासिक पाळीसुद्धा नियमित राहते. तसंच रोज सौफ खाल्ल्याने तुमच्या गर्भाशयाला कोणत्या प्रकारचा त्रास होत नाही.
४) तुम्हाला जर लघवीला जळजळ होत असेल किंवा कोणत्याही प्रकारचं युरीन इन्फेक्शन असल्यास सौफ खा यानी लगेच आराम मिळेल. उन्हाळ्यात बरेचदा महिलांना युरीनला जळजळ होण्याचा त्रास होतो. त्यावर लगेच आराम मिळण्यासाठी सौफ आणि गडीसाखरचे सेवन करा.
५) जर तुम्हाला जुलाब लागल्यास सौफ खाण्याने लगेच आराम मिळतो. सौफमध्ये एनिटोल आणि सिनेऑल नावाची तत्व असतात. जी कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन दूर करण्यात सहाय्यक ठरतात. कारण यात अँटी बॅक्टेरियल गुण असतात.
६) हात आणि पायांची जळजळ होत असल्यास एक ग्लास पाण्यात एक चमचा सौफ आणि एक चमचा अख्के धणे रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून यात खडीसाखर घालून प्या. असं नियमित काही दिवस केल्यास हात-पायाची होणारी जळजळ थांबेल.
७) सौफचा वापर हा छोट्या स्तनांचा आकार मोठा करण्यासाठी आणि तसंच सुडौल करण्यासाठीही केला जातो. बडीशोपमध्ये फ्लेवोनॉईड अँस्ट्रोजन नावाचं हार्मोन आढळतं. जे स्तनांचा आकार वाढवण्यात मदत करत असते. दूधासोबत सौफ घेतल्यास स्तनांचा आकार वाढण्यास खूपच फायदा होतो.