मराठी विनोदी अभिनेता भूषण कडू यांच्या पत्नी कादंबरी कडू यांचे कोरोनामुळे दुःखद निधन

मराठी बिग बॉस फेम व विनोदी अभिनेता भूषण कडू यांच्या पत्नी कादंबरी कडू यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी कादंबरी कडू यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु कोरोनासोबत लढाई करण्यास त्या अयशस्वी ठरल्या. वयाच्या ३९ व्या वर्षी त्यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे.

भूषण कडू यांना ७ वर्षाचा मुलगा आहे. कादंबरीच्या अचानक जाण्याचं कडू कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. कादंबरी या भूषण कडू यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या.

Print Friendly, PDF & Email
Share