गोरेगाव येथील कटंगी डॅममध्ये मान्सून पूर्व तयारीची रंगीत तालीम

गोंदिया 30: मान्सूनपूर्व तयारी 2021 च्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गोंदिया तर्फे पूर परिस्थिती मध्ये शोध बचाव कार्य संबंधाने गोरेगाव येथील कटंगी डॅममध्ये आज दि. 29 मे 2021 रोजी शोध व बचाव कामाची रंगीत तालीम घेण्यात आली.

मागील वर्षी 2020 मध्ये जिल्ह्यात आलेल्या पूर परिस्थिती लक्षात घेऊन यावर्षी जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येक तालुक्यात नागरिकांसाठी शोध व बचाव प्रशिक्षण कार्यक्रम व पूरपरिस्थिती मध्ये सुरक्षा व बचाव बाबत कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. पूर परिस्थिती मध्ये जीवित व वित्तीय हानीचे प्रभाव कमी करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गोंदिया तर्फे सदर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने नागरिकांना पूरपरिस्थिती मध्ये तात्काळ मदत पुरविण्यासाठी जिल्हा शोध व बचाव चमू तर्फे रंगीत तालीम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 


सदर कार्यक्रमात नागपूर येथून आलेले मोजेस कॉन्द्रा, निकेश चिखलोंडे शोध बचाव पथकाचे सदस्य किशोर टेंभुर्णे, नरेश उके, राजकुमार बोपचे, जसवंत रहांगडाले, रवि भांडारकर, संदीप कराडे, दिनू दिप, इंद्रकुमार बिसेन चुंन्नीलाल मुटकुरे, चिंतामण गिरेपुंजे आदी उपस्थित होते.

मान्सूनपूर्व तयारी च्या अनुषंगाने गावपातळीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच हवामान खाते व पूर परिस्थिती संदर्भात नागरिकांना व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून माहिती देण्याकरिता तालुका व गाव पातळीवर व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात येत आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें