गोंदिया जिल्ह्यात नवे 26 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

गोंदिया,दि.28 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 28 मे रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 26 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 184 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यातील कोरोना बाधित 2
रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आजपर्यंत 40,530 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 39,447 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 400 आहे. 250क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 683 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण
आजारातून बरे होण्याचे प्रमाण 97.32टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.61 टक्के आहे

Share