गोंदिया जिल्ह्यात ब्लॅक फंगसचा पहिला बळी

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनानंतर आता ब्लॅक फंगसने जाळे घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. तिरोडा येथील मुख्याध्यापकाला डोळ्यांचा त्रास होता. त्यांना ब्लॅक फंगसची लागण झाल्याने नागपूर येथे दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

सध्या सर्वत्र कोरोना विषाणूने थैमान घातले. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची वाढती रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यापेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासा देणारी बाब असतानाच आता ब्लॅक फंगस या विषाणूने जिल्ह्यात शिरकाव केला आहे. पाच दिवसांपूर्वी जिल्ह्यात एकाला ब्लॅक फंगसची लागण झाली होती. तर २० संशयितांना नागपूर येथे पाठविण्यात आले होते. तिरोड्यातील मुख्याध्यापकाला देखील या विषाणूची लागण झाल्याने त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील ब्लॅक फंगसमुळे पहिला मृत्यू आहे. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share