Sputnik V : भारतात सुरू झालं स्पूतनिक-V चं उत्पादन, ‘ही’ औषध कंपनी बनवणार वर्षाला 10 कोटी डोस

नवी दिल्ली – आरडीआयएफ आणि पॅनेसिया बायोटेकने स्पूतनिक-व्ही चे भारतात उत्पादन सुरू केले आहे. भारताची पॅनेसिया बायोटेक आता दरवर्षी देशात 10 कोटी डोस तयार करू शकते. रशियाद्वारे विकसित ही व्हॅक्सीन कोरोनाविरूद्ध परिणामकारक मानली गेली आहे.

उल्लेखनीय म्हणजे भारतात सध्या सीरम इन्स्टीट्यूटद्वारे निर्मित कोविशील्ड आणि भारत बायोटेक द्वारे तयार केलेल्या कोव्हॅक्सिनद्वारे लसीकरण केले जात आहे. आता देशात तिसरी व्हॅक्सीन स्पूतनिक-व्ही ची सुद्धा लस मिळेल. यामुळे देशाच्या मोठ्या लोकसंख्येला लवकरात लवकर लसीकरण करून महामारीवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

Share