लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरातील ग्राम.देवरी/गोंदी येथे धान खरेदी केंद्राचे उद्घाटन
Tushar Harshe/ Prahar Times
लाखनी 31: पूर्व विदर्भातील भंडारा,गोंदिया,गडचिरोली, चंद्रपूर जिल्हात धानाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.यात हलक्या आणि भारी अश्या प्रकारची लागवड होते व हलके धान दिवाळीपूर्वी येत असल्याने सण साजरा करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत होते.ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी 31 आक्टोबर 2020 ला जिल्ह्यात 79 धान खरेदी केंद्राला मंजुरी दिली आहे.याच माध्यमातून लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरातील ग्राम.देवरी/गोंदी येथे दिनांक 31 आक्टोबर 2020 रोज शनिवारला धान खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून विविध सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा पोलीस पाटील प्रधान साहेब,कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंचा सौ.आरती मेश्राम यांनी केले. आणि प्रमुख पाहुणे म्हणून मंगेश मेश्राम, आशीर्वाद मेश्राम, विनोद प्रधान,छत्रपालजी शिंदे हे उपस्थित होते तसेच गावातील स्थानिक नागरिक हे सुद्धा उपस्थित होते.