मीरावंत रुग्णालयाची खाजगी DCH म्हणून मान्यता रद्द

जिल्हा प्रशासनाकडून कोव्हीड -19 बाधीत रुग्णांच्या उपचारासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे खाजगी DCH म्हणून डॉ . राजेंद्र वैद्य , मिरावंत हॉस्पीटल गोंदिया यांना कोरोना बाधीत रुग्णांना भरती करुन उपचारासाठी मान्यता देण्यात आली होती . परंतु सदर रुग्णालया विरुध्द उपचाराकरीता अवाजवी रक्कम वसुली संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत . तसेच दिनांक 16.05.2021 रोजी मृत्यु झालेल्या एका रुग्णाचे मृतदेह दिवसभर नगर परिषद , गोंदिया यांना हस्तांतरीत न केल्याचे प्रकार घडले असुन , जिल्हा प्रशासनाकडून वरिल प्रकरणांची गंभीर दखल घेवून साथरोग प्रतिबंधक अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये डॉ . राजेंद्र वैद्य , मिरावंत हॉस्पीटल गोंदिया या रुग्णालयाची खाजगी DCH म्हणुन देण्यात आलेली मान्यता तात्काळ प्रभावाने रद्द केली आहे . तसेच इतर तक्रारीबाबत संबंधित विभाग प्रमुख यांना चौकशी करुन कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे . यापूढे सदर रुग्णालयात कोव्हीड -19 बाधीत रुग्णांचे उपचार करता येणार नाही तसेच मिरावत रुग्णालयाविरुध्द उपचारासाठी अवाजवी रक्कम किंवा सर्वधित कोणत्याही तक्रारी लेखी स्वरुपात जिल्हा शल्य चिकित्सक , के.टी.एस.सामान्य रुग्णालय , गोंदिया किंवा जिल्हाधिकारी कार्यालय येथे करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून नागरीकांना करण्यात आले आहे .

Print Friendly, PDF & Email
Share