गोंदिया जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा शिरकाव; एक पॉझिटिव्ह

गोंदिया -कोरोना संसर्गातून बरे होत असताना दुसरीकडे ब्लॅक फंगस(म्युकरमायकोसिस) या आजाराचे नवीन आव्हान जिल्हाप्रशासनापुढे उभे राहिले आहे. म्युकरमायोकसिस या बुरशीजन्य आजाराचा शिरकाव जिल्ह्यात झाला आहे. जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात ब्लॅक फंगस या आजाराने ग्रस्त रुग्णाची नोंद झाली आहे. तसेच वीसहून अधिक संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.तसेच वीसहून अधिक संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

कुणाला होतो हा आजार?

प्रत्येक कोरोनाबाधित व्यक्तीला हा आजार होईलच असे नाही, तसेच मधुमेह असलेल्या आणि कोरोना झाल्यास त्या रुग्णास स्टेरॉइड्स दिलेले असले, तरीदेखील अशा प्रत्येक रुग्णाला हा आजार होत नाही. कोणत्याही कारणाने ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे, अशा व्यक्तींना हा बुरशीजन्य जंतूंचा संसर्ग होतो. मधुमेहासारख्या आजारांमध्ये रुग्णाची प्रतिकारप्रणाली आधीपासूनच मंदावलेली असते. त्यात कोरोनाबाधित झाल्यावर विषाणूंच्या संसर्गामुळे त्या प्रतिकारप्रणालीवर ताण येतो. या रुग्णांची प्रतिकारप्रणाली स्टेरॉइड्समुळे आणखी दबली जाते. या परिस्थितीत या बुरशीजन्य विषाणूचा संसर्द होण्याची शक्यता असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.

Share