घराबाहेर फिरणार्या 20 जणांवर गुन्हे दाखल , जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन
गोंदिया, दि.18 : सध्या शासनाच्या आदेशाने लॉकडाउन सुरू आहे. यात जिल्हाधिकारी यांचे संचारबंदीचे व इतर आदेश लागू आहेत. मात्र विविध पोलीस ठाणे क्षेत्रात येणार्या भागात या आदेशांचे उल्लंघन करणार्या दुकानदार व अकारण घराबाहेर फिरणार्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
नवेगावबांध : दुकानदारासह तिघांवर गुन्हे दाखल
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासंबंधात अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने पूर्ण बंद राहतील, तर किराणा, भाजीपाला आदि आवश्यक सेवेची दुकाने सकाळी 7 ते 11 वाजतापर्यंत सुरू ठेवावे, आदेशाचे पालन न करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, असे जिल्हाधिकार्यांचे आदेश आहे. हे माहीत असूनही नवेगावबांधच्या आझाद चौकातील इलेक्ट्रिक व गिफ्ट सेंटरचे दुकानदार 16 मे रोजी सकाळी 9 ते 9.30 वाजता दरम्यान दुकानात ग्राहकांना वस्तू विक्री करताना मिळून आला. मानवी जीवनास धोका निर्माण होईल अशी कृती केल्याने व आदेशाचे उल्लंघन केल्याने पोलीस हवालदार बापू जिबल येरणे यांच्या तक्रारीवरून सदर दुकानदार व इतर दोन अश्या तिघांवर भादंविच्या कलम 188, 269, 270, सहकलम 51 व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा सहकलम 2, 3, 4, साथ रोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे नोंद करण्यात आले.
गोंदिया शहर : अकारण फिरणार्या 7 जणांवर गुन्हे
कोरोना संसर्गजन्य आजारबबात जिल्हाधिकार्यांचे संचारबंदीचे आदेश आहेत. तरी 16 मे रोजी दुपारी 12 ते 2 वाजता दरम्यान 7 जण मनोहर चौकात विनाकारण फिरताना आढळले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे व साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1987 चे उल्लंघन केल्याने तसेच त्यांच्यापासून समाजातील लोकांना या आजाराची लागण होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक चैनसिंग गोलवाल यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम 188, 269, 290, सहकलम 51 (ब), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, सहकलम 2, 3 साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आला.
रामनगर : अकारण फिरणार्या 5 जणांवर गुन्हे
जिल्हाधिकार्यांचे संचारबंदीचे आदेश असतानाही गोंदियाच्या बालाघाट टी-पॉइंट येथे 16 मे रोजी सायंकाळी 7.15 ते 7.45 वाजता 5 जण विनाकारण फिरताना व गर्दी करताना आढळले. त्यामुळे कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली व संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून केल्या जाणार्या उपाययोजनामध्ये अडथळा निर्माण केला. तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन झाले. त्यामुळे सदर आरोपींवर पोलीस शिपाई पुरुषोत्तम बरडे यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम 188, 269, सहकलम 51 (ब) आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, सहकलम 11 महाराष्ट्र कोविड विनियम 2020 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
गोंदिया शहर : अकारण फिरणार्या 8 जणांवर गुन्हे
जिल्हाधिकार्यांचे संचरबंदीचे आदेश असतांनाही मनोहर चौकात 16 मे रोजी सायंकाळी 4 वाजता दरम्यान 8 जण अकारण फिरताना मिळून आले. त्यामुळे साथरोग प्रतिबंधात्मक कायदा व जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाले. तसेच इतर लोकांना त्यांच्यापासून बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली. पोलीस हवालदार सुदेश टेंभरे यांच्या लेखी तक्रारीवरून गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम 188, 269, 290, सकलम 51 (ब), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, सहकलम 2, 3 साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.