ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी कोरोना लसिकरण मोहिमेत सहभाग घ्यावा- आमदार कोरोटे
देवरी. ता.१७ : कोरोना विषाणु संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत आहे. या संसर्गापासुन आपणास वाचविन्याकरिता शासनाद्वारे सर्व नागरिकांकरिता कोरोना लसिकरण मोहिम राबविण्यात येत आहे. शहरात मोठ्या संख्येने नागरिक या लसिकरण मोहिमेत सहभाग घेवून लसिकरण करत आहेत. परंतु ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये या लसिकरनामुळे मृत्यु होतो असा ग़ैरसमझ निर्माण झाला आहे. हा ग़ैरसमझ बाजूला सारून शासनाच्या धोरणानुसार ग्रामीण भागातील आदिवासी समजासह इतर समाजातील नागरिकांनी या कोरोना लसिकरण मोहिमेत सहभाग घ्यावा असे आवाहन आमगांव-देवरी विधानसभेचे आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.
आमदार कोरोटे हे देवरी तालुक्यातील पिपरखारी ग्रा.पं.अंतर्गत येणाऱ्या पाच गावातील लोकांशी बुधवारी(ता.१२मे) रोजी भेट घेवून कोरोना लसिकरण बाबद आयोजीत कार्यक्रमात बोलत होते. या प्रसंगी आमदार कोरोटे यांच्या सह पिपरखारीचे माजी सरपंच सुदाम भोयर, उपसरपंच मुनेश्वर भोगारे काशीराम भलावी, अशोक मडावी, उमेश मडावी, वासुदेव पुराम यांच्या सोबत पिपरखारी ग्रा.पं,अन्तर्गत येणाऱ्या महाजनटोला, बिचटोला, स्कुलटोला, पुरामटोला व गौराटोला येथील अनेक नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
या भेटी दरम्यान आमदार कोरोटे यांनी येथील गावातील विविध समस्येत यात प्रामुख्याने पिण्याचे पानी. रोड व नाली, घरगुती गॅस, विद्युत दाब आणि स्वस्त धान्य या विषयावर नागरिकांशी संवाद साधुन सविस्तर चर्चा केली.आणी आपल्या सर्व समस्या त्वरित मार्गी लावन्याचे आश्वासन दिले.
यावेळी देवरीचे अन्न पुरवठा निरीक्षक सतीश अगड़े यांच्याशी भ्रमनध्वनीवर चर्चा करुण स्वस्त धान्य विषयी तर घरगुती गॅस चे वितरक अर्चना नरवरे यांच्याशी चर्चा करूण गँस संबंधी समस्या तसेच पिपरखारी चे ग्रामसेवक श्री धुर्वे यांना सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रा.पं.सदस्य यांना विश्वासात घेवून पाण्याचे विषयी योग्य नियोजन करुण सर्व कामे पूर्ण करण्याचे तसेच बिचटोला येथे विद्युत दाब चार दिवसाच्या आत पूर्ववत करण्याचे विज वितरण कंपनी चिचगड चे कनिष्ठ अभियंता यांना निर्देश दिले.
आणि सोबतच ग्रामीण भागातील आदिवासी समाजासह इतर समाजातील सर्व नागरिकांनी कोरोना लसिकरण मोहिमेत सहभाग घेवून लसिकरण करुण घ्यावे असे आवाहन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.