तुमसर, पवनीसह भंडाऱ्यात अतिरिक्त सिटीस्कॅन युनीट : प्रफुल पटेल

जिल्ह्यात ऑक्सिजनची समस्या नाही, ऑक्सिजन बेडची संख्या वाढविणार

भंडारा 17 : जिल्ह्यात सध्या ऑक्सिजनचा पुरेशा साठा आहे. ऑक्सिजन बेडची संख्या लवकरच वाढविली जाणार आहे. तुमसर, पवनी सह भंडारा येथे अतिरिक्त सिटीस्कॅन युनीट उभारले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी येथे दिली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात काेराेना आढावा बैठकीत ते बाेलत हाेते. यावेळी आमदार राजू कारेमाेरे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी खासदार मधुकर कुकडे, सुनील फुंडे, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे उपस्थित हाेते. भंडारा जिल्ह्यात एकमेव जिल्हा सामान्य रुग्णालयात सीटी स्कॅन युनीट आहे. त्यामुळे काेराेना रुग्णांना समस्यांचा सामना करावा लागताे. ही समस्या साेडविण्यासाठी जिल्ह्यात तीन ठिकाणी सीटीस्कॅन युनीट सुरु करण्यात येणार अाहे. भंडारा जिल्हा रुग्णालयात अतिरिक्त एक युनीट तर तुमसर व पवनी येथे प्रत्येकी एक युनीट सुरु करण्यात येणार आहे. यासाठी लागणारा निधी जिल्हा नियाेजन आणि राज्य आपत्ती निवारण निधीतून दिला जाणार असल्याचे खासदार प्रफुल पटेल यांनी सांगितले. यासाेबतच जिल्हा सामान्य रुग्णालयात लहान मुलांसाठी काेविड केअर युनीट सुरु करण्याची सुचना या बैठकीत खासदार पटेल यांनी केली. जिल्ह्यात सध्या स्थितीत पुरेशा ऑक्सिजन साठा असून अदानी समुहाचे तेरा केअर ऑक्सिजन प्लॅट लवरकच कार्यान्वित हाेईल असे खासदार पटेल यांनी यावेळी सांगितले.
सुरुवातीला जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी काेराेना संसर्ग राेखण्यासाठी काय उपाययाेजना केली जात आहे. याची माहिती िदली. जिल्ह्यात ३५० ऑक्सिजन बेड असून ते ९०० पर्यंत वाढविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार राजू कारेमाेरे यांनी माेहाडी येथे काेविड केअर सेंटर सुरु करण्याची सूचना केली. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डाॅ. पियुष जक्कल यांनी भंडारा जिल्हा रुग्णालयातील टीबी वाॅर्डात लहान मुलांसाठी ५० बेडचा विशेष कक्ष उभारला जाणार आहे. बालराेग तज्ज्ञांचा टास्कफाेर्स तयार करण्यात आल्याची माहिती दिली.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यशवंत साेनकुसरे, धनंजय दलाल, जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. प्रशांत उईके, जिल्हा लसीकरण अधिकारी माधुरी माथुरकर यांच्यासह अधिकारी उपस्थित हाेते.

अदानी प्रकल्पाकडून मिळालेल्या ५० ऑक्सिजन सिलेंडरचे लाेकार्पण 

अदानी समुहाने दिलेल्या ५० जम्बाे ऑक्सिजन सिलेंडरचे लाेकार्पण खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. अदानी समुहाने काेराेना संकटात जिल्ह्याला माेठी मदत केली. या ५० ऑक्सिजन सिलेंडरसाेबत आवश्यकतेनुसार १०० सिलेंडर अदानी समुहाकडून भंडारा जिल्ह्याला दिले जाणार आहे. लवकरच १३ केअर ऑक्सिजन प्लॅट उभारला जाणार असल्याचे यावेळी खासदार पटेल यांनी सांगितले. यावेळी सीएसआर अदानी फाऊंडेशनचे नितीन शिराळकर, अदानी समुहाचे उपमहाव्यवस्थापक प्रवीण जयस्वाल उपस्थित हाेते.

रबीची धान खरेदी तात्काळ सुरु करा

जिल्ह्यात अद्यापही रबी हंगामातील धान खरेदीला प्रारंभ झाला नाही. लवकरच पावसाळ्याला सुरुवात हाेईल. त्यामुळे तात्काळ रबी हंगामातील धान खरेदी सुरु करण्याचे निर्देश खासदार प्रफुल पटेल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

Share