दिलासादायक बातमी! राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या अधिक

मुंबई | राज्यात रुग्णसंख्येत आता हळूहळू घट होत असल्याचं दिसून येत आहे. कारण राज्यात आजही नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज तब्बल 59 हजार 318 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

राज्यात आज नवीन 34 हजार 389 कोरोना रुग्णांची नोंद झाली. आज 974 कोरोना रुग्णांची मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आजपर्यंत 48,26,371 कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 4 लाख 68 हजार 109 सक्रीय रुग्ण आहेत, असंही टोपेंनी सांगितलं.

महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या 53 लाख 78 हजार 452 कोरोनाबाधितांपैकी 48 लाख 26 हजार 371 जण बरे झाले. यामुळे राज्याचा कोरोना रुग्ण बर होण्याचा दर अर्थात रिकव्हरी रेट 89.74 टक्के झाला. कोरोनामुळे राज्यात 81 हजार 486 मृत्यू झाले. तसेच कोरोना झालेल्यांपैकी 2 हजार 486 जणांचा इतर काराणांमुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारने 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या टास्क फोर्स सदस्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी डॉक्टरांसमोर ‘माझा डॉक्टर’ अशी संकल्पना मांडत मैदानात उतरण्याचं आवाहन केलंय.

Print Friendly, PDF & Email
Share