गोंदिया जिल्ह्यातील न्यु बालाजी हॉस्पीटलवर गुन्हा दाखल

गोंदियातील न्यू बालाजी हॉस्पिटल येथे कोविड रुग्णालयाची परवानगी नसतांना कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रामनगर गोंदिया येथील न्यू बालाजी हॉस्पिटलमध्ये पाच रुग्ण दगावल्याचे निर्देर्शनास आल्यामुळे या हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वंदना सवरंगपते, तहसिलदार आदेश डफळ आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांनी तपासणी पथका सोबत न्यू बालाजी हॉस्पीटल, रामनगर गोंदिया येथे १४ मे २०२१ रोजी आकस्मीकरीत्या भेट देऊन तपासणी केली .

  सदर हॉस्पीटल यांनी कोविड-19 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, गोंदिया यांची कोणतीही परवानगी नसतांनासुध्दा सदर हॉस्पीटलमध्ये कोरोना बाधीत रुग्ण भरती करुन त्यांच्यावर उपचार केले जात होते

तसेच उपचारा दरम्यान पाच (५) व्यक्ती दगावल्याची बाब तपासणीअंती दिसुन आले.

सदर बाब ही अत्यंत गंभीर स्वरुपाची असल्याने उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी याबाबत तातडीने कठोर कार्यवाही करण्याबाबत संबधितांना निर्देश दिले.

त्यानुसार नायब तहसिलदार संजय बारसागडे यांनी डॉ. नितेश बाजपेयी, न्यु बालाजी हॉस्पीटल, रामनगर गोंदिया यांच्याविरुध्द पोलिस स्टेशन रामनगर गोंदिया येथे भारतीय दंड संहिता १९६० चे कलम १८८, २६९, २७०, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५१ (B), साथ रोग अधिनियम,१८९७ चे कलम , , , तसेच महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम,२००० चे कलम ३३ () अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे .

Print Friendly, PDF & Email
Share