PM Care फंडातील व्हेंटिलेटरमध्ये मोठा घोटाळा : काँग्रेसकडून राज्यस्तरीय चौकशीची मागणी


वृत्तसंस्था / मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्र सरकारकडून व्हेंटिलेटरचा पुरवठा करण्याची मागणी केली होती. यानंतर केंद्र सरकारने पीएम केअर फंडातून राज्याला व्हेंटिलेटर वितरित केले होते. परंतु या पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटरमध्ये मोठा घोटाळा असून निकृष्ट दर्जाचे आहेत. याबाबत राज्य सरकारने राज्य स्तरीय चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. नाशिकमध्येही पीएम केअर फंडातून ६० व्हेंटिलेटर देण्यात आले होते ते कनेक्टरशिवाय पाठवण्यात आले होते संकटकाळात केंद्र सरकारकडून हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप राज्यातील नेत्यांनी केला होता.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्याल औरंगाबाद यांनी नेमलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीला पीएम केअर फंड अंतर्गत सदर संस्थेला पुरवलेले सर्व व्हेंटिलेटर पुर्णतः निरुपयोगी आढळले. त्यांच्या अहवालानुसार कंपनी तंत्रज्ञदेखील हे दुरुस्त करु शकले नाहीत. हा मोठा घोटाळा आहे. केंद्रामार्फत पुरविल्या महाराष्ट्राला पुरवलेल्या सर्व व्हेंटिलेटरची राज्यस्तरीय चौकशी करण्याची आम्ही मागणी करतो. पीएम केअर फंडच्याच्या माध्यमातून वाया गेलेला वेळ व जनतेचा पैसा अक्षम्य असल्याचे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
मोदी सरकारने देशातील सर्व कॉर्पोरेट कंपन्यांना या अपारदर्शक फंडात देणगी देण्यासाठी भाग पाडले. या फंड बाबत माहिती ही दिली नाही किंवा माहितीचा अधिकार लागू केला नाही. पण आता अशा अत्यंत तकलादू व फालतू कंपन्यांना हे कंत्राट कसे आणि का मिळाले हे जनतेला समजलेच पाहिजे. मानवतेकरिता या सर्वात मोठ्या संकटात घोटाळा सोडा पण नफेखोरीचा होऊ देण्याचा विचार करणेही अमानुष आहे. जाहीर निषेध करत असल्याचे ट्विट सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

Share