देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांचे फेसबुक अकाउंट हॅक
देवरी 12: देवरी चे तहसीलदार विजय बोरुडे यांचे फेसबुक अकॉउंट नुकतेच हॅक झाल्याची माहिती त्यांनी आपल्या सोशल मीडिया वरील चाहत्यांना दिली असून कुणीही पैशाची किंवा कसलीही माहिती विचारात असेल तर त्यांना तात्काळ सुचना दयायला विनंती केली आहे.
“माझे फेसबुक हॅक झाले असून जर माझ्या फेसबुक वरून कसलाही संदेश करत असेल किंवा काही मदत मागत असेल तर मला सूचित करा”- विजय बोरुडे , तहसीलदार देवरी
तुमचे फेसबुक खाते हॅक झाले, आता काय कराल?
सध्या सोशल नेटवर्किंगचा वापर वाढलेला आहे,त्यामुळे बहुतेक जण फेसबुकचा वापर करतात,
पण पुरेशी काळजी घेतली गेली नाही तर तुमचे फेसबुक खाते गमावण्याची पाळी तुमच्यावर येवू
शकते. जर तुमचे फेसबुक खाते हॅक झाले तर ते परत कसे मिळवायचे याची माहिती आज आपण
करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१)जर तुमचे फेसबुक खाते हॅक झाले तर,प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर जा.
http://www.facebook.com/hacked/
२)त्यानंतर चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे My Account is Compromised या पर्यायावर टिचकी दया.
३)जे पान उघडेल त्यावरील I can’t identify my account हा जो तळाला कोपर्यात पर्याय दिसेल त्यावर टिचकी दया.
४)चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे पिक वन मधून YESपर्यायाची निवड करा.
५)आणि खाली जो फॉर्म दिसेल त्यातल्या आवश्यक बाबींची पूर्तता करा आणि ती माहिती फेसबुककडे सुपूर्त करा.
असे केल्याने काही कालावधी मध्ये फेसबुक टीम कडून तुमचे खाते परत मिळवून देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल.