तब्बल 5438 लोकांना करोना लसीकरण केलेल्या परिचारिकेचा सत्कार

जागतिक परिचारिका दिनानिमित्त देवरी येथे तब्बल 5438 लोकांना करोना लसीकरण केलेल्या परिचारिकेचे शाल श्रीफळ देवून सत्कार

डॉ. सुजित टेटे

देवरी 12- देशात करोनाचे थैमान असतांना आपल्या जिवाची बाजी लावून आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी , कर्मचार्‍यांनी व परिचारिकांनी लोकांना सेवा दिली त्याची परतफेड करणे शक्य नाही परंतु जागतिक परिचारिकादिना निमित्त देवरी येथील सौ एस बी केवट या परिचारिकेने नक्षलग्रस्त तालुक्यात तब्बल 5438 लोकांना करोनाची लसीकरण करून आपली उत्कृष्ट सेवा दिल्या बद्दल माजी जिल्हापरिषद सदस्य राजू चांदेवार यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार केला.

सविस्तर वृत्त असे की करोंनाच्या महामारीत संपूर्ण देश भीतीच्या सावटाखाली असतांना परिचारिकांनी केलेले करी अलौकिक असून त्यांना त्यांच्या कार्याबद्दल आज जागतिक परिचारिका दिना निमित्त देवरी तालुक्यातील सर्व परिचारिकांना शुभेच्छा देण्यात आल्या . यावेळी तालुक्यातील करोना लसीकरण करण्याची जबाबदारी पार पाडून आतापर्यंत 5438 लोकांचे लसीकरण केलेल्या परिचारिका सौ एस बी केवट यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजू चांदेवार , संजय दरवडे , नितेश वालोदे , लेखराम निर्वाण आदि मित्रमंडळी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share