एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस निरीक्षक दया नायक यांना ‘मॅट’कडून मोठा दिलासा
मुंबई : वादग्रस्त बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाल्यावर पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. मुंबई पोलीस दलात बदल्याचे वारे वाहु लागले. तसेच अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील केल्या गेल्या. तर एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस निरीक्षक दया नायक यांची सुद्धा बदली केली होती. आता मात्र त्यांच्या बदलीला मॅट यांनी स्थगिती दिली आहे.
६ मे रोजी जारी करण्यात आलेल्या या आदेशानुसार गोंदियातील जात प्रमाणपत्र पडताळणी उपसमितीच्या कार्यालयात एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची गोंदियाला बदली करण्यात आली होती. मात्र दया नायक यांची मुंबईतून करण्यात आलेल्या बदलीला मॅटने स्थगिती दिली आहे. त्यामुळे दया नायक हे आपल्या मुंबईतील पदावर कायम राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. असे सूत्रांकडून समजते.
या दरम्यान, मुंबईतील आढळून आलेली स्फोटकांनी भरलेली कार आणि मुंबई व्यापारी मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझे याला अटक करण्यात आली. मनसूख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास ज्या ATS एस टीम्स करत होत्या त्यापैकी जुहू ATS टीमचे नेत्रृत्व हे एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस निरीक्षक दया नायक करत होते.