देवरी तालुक्यात 18-44 वयोगटातील लसीकरणाच्या नोंदणीला 100% प्रतिसाद
?11 मे 2021 ला 18 ते 44 वयोगटासाठी उपलब्ध असलेल्या सर्व केंद्रावर लसीकरणासाठी 100% नोंदणी
?सकाळी 9 वाजता पासून सुरु होणार लसीकरण
डॉ. सुजित टेटे / देवरी 11: राज्यात करोनाचे वाढते संसर्ग बघता करोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण करणे महत्वाचे आणि शेवटचे पर्याय असल्यामुळे नागरिकांनी लसीकरणाला महत्वाचे स्थान देऊन आपल्या लसीकरणासाठी नोंदणी केली असून आज 11 मे ला 18 ते 44 वयोगटासाठी होणाऱ्या लसीकरणाचे सर्व स्लॉटस बुक झाले असून 100% नोंदणी झालेली दिसून येत आहे .
देवरी तालुकातील खालील लसीकरण केंद्रावर 18-44 वयोगटातील नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांनी आपले लसीकरण करून घ्यावे असे आवाहन तहसीलदार विजय बोरुडे यांनी केलेले आहे.
ग्रामीण भागातील लोकांनी लसीकरणासाठी आपली नोंदणी करून घ्यावी आणि आपल्या सोबत आपल्या कुटुंबाला सुरक्षित करून घ्यावे जेणेकरून कोरोनावर विजय मिळविता येणार.
प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या माहितीनुसार सर्व नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी करून घ्यावी. नोंदणी कारणासाठी cowin.gov.in या संकेत स्थळावर रेजिस्ट्रेशन करून घ्यावा.